नोरा फतेहीचा फिफा वर्ल्ड कपमध्ये जलवा; चाहत्यांची जिंकली मनं

नोरा फतेहीचा फिफा वर्ल्ड कपमध्ये जलवा; चाहत्यांची जिंकली मनं

रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा पराभव करून लिओनेल मेस्सीच्या संघाने विक्रम केला आहे. त्याचबरोबर नोरा फतेही हिनेही या विश्वचषकात एक विक्रम केला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

फिफा विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात जबरदस्त सामना झाला. अर्जेंटिना संघाने फिफा ट्रॉफी जिंकली आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा पराभव करून लिओनेल मेस्सीच्या संघाने विक्रम केला आहे. त्याचबरोबर बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही हिनेही या विश्वचषकात एक विक्रम केला आहे. नोराचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

फिफा विश्वचषक 2022 च्या समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच धमाका करणारा ठरला. नोरा फतेहीने या इव्हेंटमध्ये एक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यात नोराने जबरदस्त परफॉर्मन्स दिला असून या परफॉर्मन्सने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे.

फिफा विश्वचषकाच्या समारोप समारंभात परफॉर्म करणारी ती एकमेव भारतीय स्टार होती. जगातील सर्वात मोठ्या टूर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नोराचे स्टारडम वाढेल आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही तिचे स्थान मजबूत होईल, असे मानले जात आहे.

या कार्यक्रमात नोरा काळ्या रंगाच्या चमकदार आउटफिटमध्ये डान्स करताना दिसली. हातात माईक घेऊन तिने स्टेजवर एन्ट्री घेतली आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com