Majhi Jaanu
Majhi JaanuTeam Lokshahi

'मी सिंगल' च्या घवघवीत यशानंतर नादखुळा म्युझिकचे 'माझी जानू' गाणे प्रदर्शित

"मी सिंगल" च्या यशानंतर नादखुळा म्युझिक घेऊन आले आहे गाण्याचा पुढचा भाग "माझी जानु"

आजच्या या सोशल मीडियाच्या युगात मराठी कलाकारांना आज एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. सोशल मीडियामुळे आज नवनवीन कलाकार प्रसिद्ध होत आहे. अशातच या कलाकारांना एकत्र घेऊन नादखुळा म्युझिकने 'मी सिंगल' हे गाणे प्रदर्शित केले होते. हे गाणे चाहत्यांच्या प्रचंड पसंतीत पडत होते. या गाण्याला 1 कोटीहून अधिक विव्ह मिळाले होते. आता याच गाण्याच्या यशानंतर प्रशांत नाकती यांनी 'माझी जानू' चाहत्यांसाठी आणले आहे. या गाण्यालाही प्रचंड प्रेम संगीतप्रेमिंकडून मिळत आहे.

हे गीत ' मी सिंगल' या गीताचा दुसरा भाग असल्याचे सांगितले जात आहे. या गाण्यात 'मी सिंगल' ची पार्श्वभूमी असलेले दिसून येत आहे. एक मैत्रीण आपल्या दोन मित्रांची संपूर्ण गाण्यात कशी चेष्टा करती असे काही दाखवण्यात आले आहे. या गाण्याच्या दुसऱ्या भागातही दोन मित्र कसे सिंगलच राहतात. हे अगदी विनोदी शैलीत दाखवले आहे. या गाण्याला आतापर्यंत 18 लाखाहून अधिक लोकांनी बघितल आहे. सध्या हे गाणे प्रचंड चर्चेत येत आहे.

निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित एक भन्नाट गाणं युट्युबवर प्रदर्शित झाले आहे. कुणाल गांजवाला आणि सोनाली सोनावणे या म्युझिकल जोडीने हे गाणे गायले असून या गाण्यात गौरी पवार म्हणजेच बिनधास्त मुलगी, निक शिंदे आणि रितेश कांबळे यांनी टीनएजर्सची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबतच आर्या कुलकर्णी, अदिती इंगळे, विजय सोनवणे या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. या गाण्याचे शब्द प्रशांत यांनी लिहिले असून संगीतही त्यांनीच दिले आहे

Lokshahi Marathi
www.lokshahi.com