Narendra Modi
Narendra ModiTeam Lokshahi

Oscar Awards 2023 : आरआरआर' आणि 'द एलिफंट विस्परर्स'च्या टीमचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन; केलं ट्विट

RRR चित्रपटाने घडवला इतिहास घडवला आहे.

RRR चित्रपटाने घडवला इतिहास घडवला आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो.

एस एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत आनंदाने वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्यात 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं होते.

याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे. मोदींनी सोशल मिडियावर ट्विट केलं आहे. मोदींनी म्हटले आहे की, एम एम किरावाणी, चंद्रबोस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. भारताला आनंद होत आहे आणि अभिमान वाटत आहे.पुढील अनेक वर्षे स्मरणात राहिल, असं हे गाणं आहे. तसेच 'द एलिफंट विस्परर्स' च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन असे म्हणत तसेच 'द एलिफंट विस्परर्स'च्या टीमचे त्यांनी अभिनंदन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com