Oscar Awards 2023 :  RRR चित्रपटानं घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर अवॉर्ड

Oscar Awards 2023 : RRR चित्रपटानं घडवला इतिहास, 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर अवॉर्ड

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा भारतीयांसाठी खास आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

RRR चित्रपटाने घडवला इतिहास घडवला आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा पुरस्कार मिळाला आहे.  चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. 

एस एस एस राजामौली दिग्दर्शित आरआरआऱ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत आनंदाने वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. त्यात 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं होते.

नाटू नाटूला ऑस्कर मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागले होते. आरआरआरला ऑस्कर मिळताच आता देशभरातील चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com