Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा करणार लग्न; 'या' खासदारानं केलं ट्वीट
Admin

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा करणार लग्न; 'या' खासदारानं केलं ट्वीट

परिणीती चोप्रा सध्या आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

परिणीती चोप्रा सध्या आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. एकत्र लंच आणि डिनरसाठी जात असताना मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर हे दोघं दिसले होते. त्यानंतर चर्चांना उधान आले. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

यातच आता आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी एक ट्वीट शेअर करुन परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, , 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.' असे त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे.

त्यामुळे आता त्यांच्या या ट्वीटमुळे परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com