'दगडी चाळ 2'मध्ये 'कलरफुल' पूजा सावंतचा रोमँटिक अंदाज; पोस्टर रिलीज

'दगडी चाळ 2'मध्ये 'कलरफुल' पूजा सावंतचा रोमँटिक अंदाज; पोस्टर रिलीज

दगडी चाळ चित्रपटातील कलरफुल म्हणजेच सोनल आणि सुर्या यांची लव्हस्टोरी सर्व तरुणांना आजही भुरळ घालते. ही जोडी आता पुन्हा एकदा 'दगडी चाळ 2ट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दगडी चाळ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला होता. या चित्रपटातील कलरफुल म्हणजेच सोनल आणि सुर्या यांची लव्हस्टोरी सर्व तरुणांना आजही भुरळ घालते. ही जोडी आता पुन्हा एकदा दगडी चाळ 2 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुजाचा कलरफुल लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

दगडी चाळच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून यामध्ये कोणते चेहरे झळकणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आता यातील कलाकारांचे लूक समोर येत आहेत. नुकतेच पुजा सावंतचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यातील एका पोस्टरमध्ये सोनल सूर्याला मिठी मारून ‘आय लव्ह यू हबी’ असं म्हणत आहे. धागा धागा विणलेल्या नात्याची, दिवसागणिक उमलत्या कलरफुल प्रेमाची, उलगडत आहे गोष्ट पुन्हा, असे कॅप्शन पोस्टरला दिले आहे.

तर, दुसऱ्या पोस्टरमध्ये अंशुमन हा सूर्याचा म्हणजेच अंकुश चौधरीच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार असून या पोस्टरवर ‘आय लव्ह यू डॅडी’ असे म्हणताना दिसत आहे. हे पोस्टर्स पाहता एक कौटुंबिक कहाणी पाहायला मिळणार, असे दिसत आहे. परंतु, सूर्याने ‘डॅडीं’ची साथ सोडली का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, याआधी दगडी चाळ 2 चा टीझरही रिलीज झाला होता. या टीझरमध्ये सुर्याच्या चेहऱ्यांवर प्रचंच राग दिसून येत आहे. व 'चुकीला माफी नाही’ हा संवाद म्हणणारे डॅडी म्हणजेच अभिनेता मकरंद देशपांडे यांचाही लूक काहीच दिवसांपुर्वी समोर आला होता.

दरम्यान, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ २’ १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com