ऋषभ पंतचा भीषण अपघात; उर्वशी रौतेलाने केली प्रार्थना, म्हणाली...

ऋषभ पंतचा भीषण अपघात; उर्वशी रौतेलाने केली प्रार्थना, म्हणाली...

ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यादरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एक पोस्टही व्हायरल होत आहे.

भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर आहे. चाहते आणि सेलिब्रिटी त्याच्यासाठी प्रार्थना करू लागले. यादरम्यान, अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एक पोस्टही व्हायरल होत आहे.

 ऋषभ पंतचा भीषण अपघात; उर्वशी रौतेलाने केली प्रार्थना, म्हणाली...
ऋषभ पंतच्या अपघातच CCTV फुटेज आलं समोर

उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत उर्वशीने कॅप्शनमध्ये प्रार्थना करत आहे, असे लिहिले आहे. उर्वशीने तिच्या कॅप्शनमध्ये व्हाईट हार्ट इमोजीचाही वापर केला आहे. उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव लिहिले नसले तरी कमेंट सेक्शनमध्ये सोशल मीडिया यूजर्सचे अभिनेत्रीची ही पोस्ट फक्त ऋषभसाठी असल्याचा दावा करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी उर्वशीला फोटोसाठी ट्रोल केले आहे. एका यूजरने उर्वशीच्या पोस्टवर नागिन असल्याची कमेंट केली आहे.

दरम्यान, क्रिकेटर ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे हा अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला व जळून खाक झाली. यामध्ये ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात तातडीने दाखल केले असून त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com