प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; ‘मुळशी पॅटर्न’चा दुसरा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; ‘मुळशी पॅटर्न’चा दुसरा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चक्क डोक्यावर उचलून घेतलं. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची विदारक कहाणी मांडण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र किंग आणि क्विन कॉन्टेस्ट २०२३ या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमृता फडणवीस तसेच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे उपस्थित होते. यावेळी प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न २’ची घोषणा केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com