"प्रेम म्हणजे काय असतं?' ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

"प्रेम म्हणजे काय असतं?' ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा प्रेम म्हणजे काय असतं? या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

साताऱ्याच्या तख्त प्रॉडक्शनने "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटाची पहिलीवहिली निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून मांडला जाणार आहे. नवोदित कलाकारांना या चित्रपटातून संधी देण्यात आली आहे.

खळाळत वाहणाऱ्या धबधब्याजवळ प्रसन्नतेनं बसलेली लहान मुलगी आणि मोहरून जाणारा लहान मुलगा या टीजरमध्ये दिसतात. तसंच प्रेम म्हणजे काय हे सांगतानाच आपल्या आयुष्यातल्या प्रेमाची आठवण करून देणारा, जुन्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक करणारा व्हॉईस ओव्हरही ऐकू येतो. चित्रपटाचं नाव आणि टीजरमधून चित्रपट रोमँटिक असेल असा अंदाज बांधता येत असला, तरी कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे

Lokshahi
www.lokshahi.com