त्याला मला इनरवेअरमध्ये पाहायचे होते, प्रियांका चोप्राचा खुलासा

त्याला मला इनरवेअरमध्ये पाहायचे होते, प्रियांका चोप्राचा खुलासा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपटसृष्टीत अनेक मोठे खुलासे केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने चित्रपटसृष्टीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. प्रियंका चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एका दिग्दर्शकाला तिला इनरवेअरमध्ये पाहायचे होते, असा खुलासा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड हादरले आहे. प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. या घटनेबाबत प्रियांका चोप्राने हा अतिशय अमानवी क्षण असल्याचे म्हंटले आहे.

प्रियांका चोप्रा म्हणाली की, ही घटना 2002 किंवा 2003 सालची आहे. एका चित्रपटात अंडरकव्हर एजंटची भूमिका करत होते. एका सीनमध्ये मला एका माणसाला सिड्यूस करायचे होते. यासाठी मला एक एक करून माझे कपडे काढायचे होते. त्यामुळे मला सीनसाठी जास्तीत जास्त कपडे घालायचे होते.

यानंतर चित्रपट निर्माते म्हणाले, मला तुला अंडरवेअरमध्ये पहायचे आहे, नाहीतर कोणी हा चित्रपट पाहायला का येईल? हे थेट माझ्याशी नव्हे तर माझ्या स्टईलिस्टला सांगितले होते. तो इतका अमानवी क्षण होता, माझ्या टॅलेंटचा काही उपयोग नाही हे मला त्यावेळी जाणवले. दोन दिवस काम केल्यानंतर प्रियंका चित्रपटातून बाहेर पडली आणि त्यांचे पैसे परत केले, असे तिने सांगितले.

दरम्यान, प्रियांकाने 2002 मध्ये तमिळ चित्रपट 'थमिझन'मधून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2003 मध्ये 'अंदाज'मधून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या सिनेमानंतर प्रियंकाने 'ऐतराज', 'मुझसे शादी करोगी', 'फॅशन', 'डॉन', 'बर्फी!', 'बाजीराव मस्तानी', 'मेरी कॉम', 'द व्हाइट टायगर'सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com