Priyanka Chopra
Priyanka Chopra Team Lokshahi

'सिटाडेल'मधील प्रियंकाचा फर्स्ट-लूक रिलीज

'सिटाडेल'च्या फर्स्ट-लूकसह प्रीमियरची तारीख जाहीर

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आपल्या अ‍ॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर सिटाडेल सिरीजचे फर्स्ट-लूक फोटो जारी केले आहेत. रोमांच आणि उत्साह असलेल्या या सिरीजच्या 2 एपिसोडचा एक्सक्लूसिव प्रीमियर शुक्रवारी 28 एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल, अशी घोषणा केली आहे. यानंतर 26 मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाईल.

रुसो ब्रदर्स AGBO आणि शो-रनर डेव्हिड वील या लँडमार्क, हाय-टेक ड्रामाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. यामध्ये, स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल यांसह रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास यांनी मुख्य व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. अशातच, 'सिटाडेल'ही सिरीज जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमधील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध होईल.

या सिरीजमध्ये मेसन केनच्या भूमिकेत रिचर्ड मॅडेन, नादिया सिंगच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा जोनास, बर्नार्ड ऑरलिकच्या भूमिकेत स्टॅन्ली टुकी, डहलिया आर्चरच्या भूमिकेत लेस्ली मॅनव्हिल, कार्टर स्पेन्सच्या भूमिकेत ओसी इखिले, एब्बी कॉनरॉयच्या भूमिकेत ऍशले कमिंग्स, एंडर्स सिल्जेच्या भूमिकेत रोलँड मोलर आणि डेविक सिल्जे, आणि काओलिन स्प्रिंगल हेंड्रिक्सने कॉनरॉयची भूमिका साकारली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com