Priyanka Chopra
Priyanka ChopraTeam Lokshahi

प्रियांकाने मुलीसोबत शेअर केला फोटो; चाहते झाले नाराज

बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे.

बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. तसेच प्रियांका (Priyanka Chopra) सोशल मिडियावर सक्रिय असून ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी प्रियांकाने एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट पाहून चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव केला आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांकासोबत मुलगी मालती (Malti) दिसत आहे. या फोटोंमध्ये दिसते आहे की, प्रियांका तिच्या मुलीबरोबर खिडकीत बसून न्यूयॉर्कमधील सुंदर दृश्य पाहात आहे.

प्रियांकाने हे फोटो शेअर करत या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की आमची पहिली ट्रीप टू बिग. तसेच प्रियांकाची ही पोस्ट पाहून अनेक सेलिब्रिटींनी सुंदर कमेंट केले आहे. प्रियांकाच्या या पोस्टाला चाहत्यांकडून खूप पसंत मिळताना दिसत आहे. तर काही चाहते प्रियांकावर नाराज असल्याचे दिसत आहेत. नाराजी व्यक्त करण्याचे कारण प्रियांकाने शेअर केलेल्या या फोटोंमध्येही मालतीचा चेहरा दिसत नाही.

Priyanka Chopra
Priyanka Chopra : प्रियांकाची मुलगी मालती दिसली 'या' गाण्यावर डान्स करताना

प्रियांका शेवटी 'द व्हाईट टायगर' या बॉलिवूड सिनेमामध्ये तर 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन' या हॉलिवूड चित्रपटामध्ये ती दिसली होती. प्रियांकाचा तिच्या आगामी चित्रपट 'जी ले जरा' यामध्ये दिसणार आहे.

Lokshahi
www.lokshahi.com