Jaggu Ani Juliet
Jaggu Ani JulietTeam Lokshahi

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची निर्मिती ‘जग्गू आणि जुलिएट’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जग्गू आणि जुलिएट' हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस

'जग्गू आणि जुलिएट' (Jaggu Ani Juliet) हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जग्गू आणि जुलिएट' या सिनेमाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली असून हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. तर अभिनेता अमेय वाघ- अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे.

'जग्गू आणि जुलिएट' या सिनेमाची एक झलक अभिनेता अमेय वाघने प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अमेयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, अमेय आणि वैदेही दोघे बाईकवर बसलेत, वैदेही गाडी चालवत आहे तर अमेय मागे गाडीवर उभा आहे. तसेच अंगावर रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे. त्यावर ‘Rich’असं लिहिले आहे. तर अमेयने शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शनही दिले आहे. "फेब्रुवारीत मिळणार प्रेमाची भेट, जग्गू आणि जुलिएट. तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी" असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Jaggu Ani Juliet
अमेय वाघने पत्नीला दिल्या जरा हटके शुभेच्छा

पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com