Swara Bhasker Wedding: स्वरा भास्करच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले राहुल गांधी
Admin

Swara Bhasker Wedding: स्वरा भास्करच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले राहुल गांधी

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काल रात्री (16 मार्च) सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केल्यानंतर दिल्लीत तिचे रिसेप्शन आयोजित केले होते.

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने काल रात्री (16 मार्च) सपा नेते फहाद अहमदसोबत लग्न केल्यानंतर दिल्लीत तिचे रिसेप्शन आयोजित केले होते. त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांसह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. स्वरा आणि फहादच्या रिसेप्शन पार्टीला काँग्रेस नेते राहुल गांधीही पोहोचले. ज्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, लोकांनी अनेक कमेंट्स करायला सुरुवात केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी कडेकोट बंदोबस्तात स्वरा आणि फहादच्या रिसेप्शनला पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी स्वरा भास्कर आणि फहादसोबत भरपूर फोटो काढताना दिसत आहेत. राहुलच्या व्हायरल झालेल्या फोटोची खिल्ली उडवत काही लोक स्वरा भास्करला विचारत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींना का बोलावले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com