'आरआरआर'चा पुन्हा एकदा जलवा, ठरला बेस्ट फॉरेन लैंग्वेज चित्रपट

'आरआरआर'चा पुन्हा एकदा जलवा, ठरला बेस्ट फॉरेन लैंग्वेज चित्रपट

आरआरआर हा चित्रपट जगभर धुमाकूळ घालत आहे. आरआरआरने पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर भारताचे नाव उंचावले आहे.

एसएस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट जगभर धुमाकूळ घालत आहे. आरआरआरने पुन्हा एकदा जागतिक व्यासपीठावर भारताचे नाव उंचावले आहे. गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाने बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म क्रिटिक्स चॉईस पुरस्कार जिंकला आहे. ही माहिती क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे.

एसएस राजामौलीचा 'आरआरआर'सोबत क्रिटिक्स चॉईस प्रकारात 'ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट', 'अर्जेंटिना 1985', 'बार्डो', 'फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ हँडफुल ऑफ ट्रुथ्स', 'क्लोज' आणि 'डिसीजन टू लीव्ह' या चित्रपटांशी स्पर्धा होती. पण, या सर्व चित्रपटांना मागे टाकून 'आरआरआर' या चित्रपटाने बेस्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म क्रिटिक्स चॉईस पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार घोषित करताना ट्विटमध्ये आरआरआर चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूचे खूप खूप अभिनंदन, असे लिहीले आहे.

क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एसएस राजामौली यांचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ते ट्रॉफी हातात धरताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. हा क्षण केवळ आरआरआर चित्रपटासाठीच नाही तर भारतीय चित्रपटांसाठीही खूप खास आहे.

याआधीही लॉस एंजेलिस येथे झालेल्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने इतिहास रचला. आरआरआरच्या 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com