राजकुमार संतोषींचे 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; 'गांधी-गोडसे' नव्या चित्रपटाची घोषणा

राजकुमार संतोषींचे 9 वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक; 'गांधी-गोडसे' नव्या चित्रपटाची घोषणा

राजकुमार संतोषी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. राजकुमार संतोषींनी त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

राजकुमार संतोषी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. राजकुमार संतोषींनी त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या नावाची सगळीकडे चर्चा होत आहे. राजकुमार संतोषी यांच्या नवीन चित्रपटाचे नाव गांधी-गोडसे: एक युद्ध आहे.

राजकुमार यांची मुलगी तनिषा संतोषी यांनी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये राजकुमार संतोषीच्या हिट चित्रपटांचे सीन आणि संवाद व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओसोबत त्याने चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. गांधी-गोडसे: एक युद्ध हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र, 'गांधी-गोडसे : एक युध्द' या चित्रपटाचे कलाकार कोण असणार याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.

राजकुमार संतोषी यांनी घायाल, दामिनी, घटक, खाकी, अंदाज अपना अपना, लज्जा, चायना गेट, अजब प्रेम की गज़ब कहानी आणि द लिजेंड ऑफ भगत सिंग सारखे चित्रपट दिले आहेत. गांधी-गोडसे: एक युद्ध या चित्रपटातून ते तब्बल नऊ वर्षांनी पडद्यावर परतत आहे. विशेष म्हणजे राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे: एक युद्ध बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा चित्रपट पठाण यांच्याशी टक्कर देणार आहे.

पठाण हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी प्रदर्शित होणार आहे. सध्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणही पठाण चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग रिलीज करण्यात आले आहे. यावर बरीच टीका आणि वाद होत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com