Raju Srivastava
Raju SrivastavaTeam Lokshahi

Raju Srivastava : राजू श्रीवास्तवच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 15 दिवसांनी कॉमेडियन आला शुद्धीवर

15 दिवसांनी कॉमेडियन आला शुद्धीवर

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 15 दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेल्या राजूला अखेर शुद्ध आली आहे.

सचिवांनी चांगली बातमी दिली

राजू श्रीवास्तव यांचे पर्सनल सेक्रेटरी यांनी ही बातमी शेअर करताना सांगितले की, राजू श्रीवास्तव यांना १५ दिवसांनी शुद्धी आली आहे. दिल्लीच्या एम्समधील डॉक्टरांकडून त्यांच्यावर देखरेख करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. ही बातमी आल्यानंतर त्याच्या बरे होण्याच्या आशा वाढल्या आहेत.

10 ऑगस्ट रोजी व्यायाम केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना लवकरात लवकर दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. मेंदूचा बराचसा भाग खराब झाल्याच्या बातम्याही आल्या आणि त्यांना व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले.

Raju Srivastava
Urfi Javed : उर्फी जावेदच्या रिव्हलिंग ड्रेसने वाढवले तापमान, म्हणाली- 'कोणी दगड मारला तर...'
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com