रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटाचे टायटल समोर; चाहते झाले कंफ्यूज्ड

रणबीर आणि श्रद्धाच्या चित्रपटाचे टायटल समोर; चाहते झाले कंफ्यूज्ड

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत त्यांच्या आगामी चित्रपटासाठी दर्शक वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाच्या इनीशियल्सचे टिझर प्रदर्शित केले आहे.

लव रंजनचे चित्रपट आपल्या अनोख्या निर्मितीसाठी ओळखले जातात. यामध्ये सामाजिक गोष्टी तसेच, विनोद यांचे उत्कृष्ट मिश्रण पाहायला मिळते. अशातच, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत त्यांच्या आगामी चित्रपटासाठी दर्शक वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाच्या इनीशियल्सचे टिझर प्रदर्शित केले आहे. या टिझरमध्ये शीर्षकाच्या 'TJMM' या इनीशियल्सचे असून दर्शकांमध्ये आता शीर्षक काय असेल यावरून उत्कंठा वाढत आहे.

तसेच, लवचे चित्रपट मनोरंजक आणि आकर्षक शीर्षकांसाठी ओळखले जातात. 'प्यार का पंचनामा' किंवा 'सोनू के टीटू की स्वीटी' सारखा हाही चित्रपट मोठा पडदा गाजवणार यात शंका नाही.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

दरम्यान, रणबीर लव रंजन यांच्या चित्रपटाव्यतिरिक्त 'अॅनिमल' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. तर, श्रद्धा कपूर रुखसाना कौसरच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com