नव्या वर्षात रणबीर कपुरचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

नव्या वर्षात रणबीर कपुरचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

चित्रपटाचे पोस्टर आऊट; पोस्टर चाहत्यांचा पसंतीला

नवीन वर्षाचा सुरूवातीला रणबीर कपुरचा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. रणबीरने आगामी 'अॅनिमल' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. सध्या सोशल मिडियावर 'अॅनिमल' चित्रपटाचा पोस्टर तुफान वायरल होताना दिसत आहे. 'अॅनिमल' चित्रपटाने चाहत्यांनचे लक्ष वेधुन घेतले आहे.

या चित्रपटात रणबीर सोबत दक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका मंदाना. देखील दिसणार आहे. पहिल्यांदाच रणबीर आणि रश्मीका स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. रणबीरने शेअर केलेल्या अॅनिमलच्या फस्ट लुकमध्ये तो खूपच वेगऴ्या अवतारात दिसत आहे. आतापर्यंत रणबीरने रोमँटीक भुमिका साकारल्या आहेत. त्यातुन बाहेर येत रणबीर ने एक हिंसक भुमिका साकारली आहे. शेअर केलेल्या पोस्टर मध्ये दिसत आहे की त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे पण तोही पूर्ण रक्ताने माखलेला आहे. तर हातावर जखम देखील आहे. शिवाय त्याच्या काखेत एक कुराड ही दिसत आहे जी देखील रक्ताने माखलेली आहे. सध्या हा पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

रणबीरच्या पोस्टरचे काहींनी कौतुक केले तर काहींनी टीका केली आहे. ॲनिमल या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. ज्यांनी आजपर्यंत 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग' सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. संदीप रेड्डी वंगा यांनी शेअर केलेल्या ॲनिमलचा अनाउन्समेंट व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होत आहे की वडील आणि मुलाच्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा यामध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या रणबीरच्या ॲनिमल या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com