'रंग दे' म्युझिक अल्बम रसिकांच्या भेटीला

'रंग दे' म्युझिक अल्बम रसिकांच्या भेटीला

मराठी अल्बम विश्वात सातत्याने नवनवे प्रयोग होत असतात. शब्दप्रधान आणि संगीतमय आविष्कारात अशाच एका अल्बमची भेट संगीतप्रेमींना मिळणार आहे. प्रभास फिल्मसच्या रंग दे या हिंदी आणि मराठी अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Published on

मराठी अल्बम विश्वात सातत्याने नवनवे प्रयोग होत असतात. शब्दप्रधान आणि संगीतमय आविष्कारात अशाच एका अल्बमची भेट संगीतप्रेमींना मिळणार आहे. प्रभास फिल्मसच्या 'रंग दे' या हिंदी आणि मराठी अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे.

संग्राम नाईक यांची निर्मीती असलेला 'रंग दे' हा अल्बम रुपेश चव्हाण आणि रोहितराज कांबळे यांनी दिग्दर्शित केलाय. मंदार चोळकर यांनी 'रंग दे' या अल्बमची गीतरचना केली असून हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी वावरे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत. 'रंग दे' हा एक उत्फुल गाण्यांचा ठेवा असून रसिकांच्या पसंतीला उतरण्याचा विश्वास रंग दे टिमने व्यक्त केलाय. २७ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये या अल्बमचे अनावरण होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com