Ranveer-Deepika
Ranveer-DeepikaTeam Lokshahi

Ranveer-Deepika पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी; घेतले बाप्पाचे आशीर्वाद

देशभरात 10 दिवसांपासून गणेशोत्सवाची धूम दिसून आली. गणेशोत्सवात सर्वसामान्स लोकांपासून ते मोठ्यामोठ्या सेलिब्रेटीपर्यत सार्वांनीच ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं.

देशभरात 10 दिवसांपासून गणेशोत्सवाची धूम दिसून आली. गणेशोत्सवात सर्वसामान्स लोकांपासून ते मोठ्यामोठ्या सेलिब्रेटीपर्यत सार्वांनीच ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. अश्यातच अभिनेत्री दीपिका पादुकोण, अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खान आणि इतर बॉलिवूड स्टारर्सने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण मोठ्या उत्सहात हा सण साजरा करतात. सोबतच सेलिब्रेटी ठिकठिकाणी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतात. महारष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झाला आहे.

नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहने मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेश दर्शनासाठी गेले होते. सोबतच अभिनेत्री सारा अली खानसुद्धा पोहचली होती. या तिघांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये तिन्ही सेलिब्रेटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना दिसून येत आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com