बोल्ड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहचा  पोलिसांसमोर मोठा खुलासा; फोटोशी छेडछाड केलीयं

बोल्ड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहचा पोलिसांसमोर मोठा खुलासा; फोटोशी छेडछाड केलीयं

रणवीर सिंगविरोधात मुंबई पोलिसांत दाखल करण्यात आली होती तक्रार
Published on

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच यूनिक स्टाइलसाठी ओळखला जातो. परंतु, मध्यंतरी रणवीर त्याच्या न्यूड फोटोंमुळे चर्चेत होता. हे फोटोशूट त्यांच्यासाठी चांगलेच अडचणीचे ठरले आहे. रणवीर सिंगविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आज रणवीर सिंगने जबाब नोंदवला आहे. माझा एक फोटो मॉर्फ करण्यात आला असल्याचा दावा त्याने केला आहे.

रणवीरने गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांकडे न्यूड फोटोशूट प्रकरणी आपला जबाब नोंदवला होता. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोटोशी कोणीतरी छेडछाड केली असल्याचा दावा रणवीरने आपल्या जबाबात केला आहे.

रणवीर म्हणाला की, इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली सात फोटो अश्लील नव्हते आणि यात त्याने अंडरवेअर घातले होते. तक्रारदाराने आरोप केला होता की, त्याचे खाजगी भाग दिसत आहेत. परंतु, ते फोटोशूटचा भाग नव्हता, असे त्याने सांगितले आहे.

रणवीर सिंगविरुद्ध २६ जुलै रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर दाखल करण्यात आला होती. वृत्तानुसार, एका एनजीओ कार्यकर्त्याने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रणवीरवर 'महिलांच्या भावना दुखावल्याचा' आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, रणवीर सिंग 'रॉकी और रानी और प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्टसोबत आणि 'सर्कस'मध्ये पूजा हेगडे आणि जॅकलीन फर्नांडिससोबत दिसणार आहे. रणवीर सिंग अखेरचा शालिनी पांडेसोबत 'जयेशभाई जोरदार' चित्रपटात काम करताना दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com