ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले रवीना आणि अक्षय, फोटो व्हायरल

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले रवीना आणि अक्षय, फोटो व्हायरल

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांची लव्हस्टोरी ९० च्या दशकात खूप गाजली होती. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु, काही कारणास्तव हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांची लव्हस्टोरी ९० च्या दशकात खूप गाजली होती. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. परंतु, काही कारणास्तव हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. ब्रेकअपनंतर दोघेही कधीच एकत्र दिसले नाहीत. रवीना आणि अक्षयला पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांना अपेक्षाही नव्हती. परंतु, अक्षय आणि रवीना नुकतेच अनेक वर्षांनंतर मोस्ट स्टायलिश अवॉर्ड 2023 मध्ये एकत्र दिसले. यादरम्यान दोघांची चांगली बॉन्डिंगही पाहायला मिळाली. एकमेकांना भेटल्यानंतर दोघेही आनंदी दिसत होते.

यादरम्यान अक्षय कुमारला मोस्ट स्टायलिश मॅन 2023 चा पुरस्कार देण्यात आला. ते देण्यासाठी रवीना टंडन मंचावर आली. पुरस्कार देण्यासाठी अक्षय कुमारच्या नावाची घोषणा झाली व अक्षयने स्टेजवर जाताच रवीनाला मिठी मारली. यानंतर रवीनाने अक्षय कुमारला हा पुरस्कार दिला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघे एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. अक्षय आणि रवीनाला एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अक्षय आणि रवीना 1994 मध्ये आलेल्या मोहरा चित्रपटात एकत्र दिसले होते. यानंतर 1995 मध्ये त्यांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आले होते. दोघांनी मंदिरात लग्न केल्याचीही बातमी समोर आली होती. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही. खिलाडीच्या शूटिंगदरम्यान अक्षयची रेखासोबतची जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. हे रवीनाला आवडले नाही. एका हॉटेलमध्ये पार्टी दरम्यान रवीनाने अक्षयला रेखासोबत रात्री उशिरापर्यंत पाहिले. हेच त्यांच्या ब्रेकअपचे कारण ठरले. यानंतर रवीना आणि अक्षय कधीही एकत्र दिसले नाहीत.

याशिवाय रवीनासोबत अक्षय शिल्पा शेट्टीलाही डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याने रवीनाशी लग्न करण्याचे वचन दिले होते. पण, जेव्हा रवीनाला त्याच्या शिल्पा शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल कळले तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी झाली. अशा अनेक रवीना आणि अक्षय यांच्या ब्रेकअपची कारणे चर्चिले जातात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com