रितेश- जिनिलियाचा 'वेड' आता ओटीटीवर; जाणून घ्या कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

रितेश- जिनिलियाचा 'वेड' आता ओटीटीवर; जाणून घ्या कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही.

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मुल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं 'वेड' चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या बघताना येणार आहे. रितेश आणि जिनिलाया यांचा हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्रामवरील पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीम केला जाणार आहे. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर यांनी काम केलं आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com