RRR ने 'गोल्डन ग्लोब' मध्ये इतिहास रचला, 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला पुरस्कार

RRR ने 'गोल्डन ग्लोब' मध्ये इतिहास रचला, 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला पुरस्कार

जगातील सर्वात लोकप्रिय अवॉर्ड शो 'गोल्डन ग्लोब 2023' सुरू झाला आहे. जगभरातील चित्रपट गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहेत.

जगातील सर्वात लोकप्रिय अवॉर्ड शो 'गोल्डन ग्लोब 2023' सुरू झाला आहे. कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्समध्ये येथे हा सोहळा पार पडत आहे. जगभरातील चित्रपट गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहेत. अशातच, एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने इतिहास रचला आहे. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि राजामौली यांच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. तसेच, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे.

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. हे नॉन इंग्रजी भाषा आणि सर्वोत्कृष्ट मूळ गाणे मोशन पिक्चरसाठी नामांकित झाले आहे. एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे 2022 च्या हिट गाण्यांपैकी एक आहे. त्याची तेलुगू वर्जन ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी कंपोज केले आहे आणि कला भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणे लिहिले आहे. कीरवाणी गोल्डन ग्लोब पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचले.

गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या गाण्यांमध्ये टेलर स्विफ्टचे 'कॅरोलिना', गिलेर्मो डेल टोरोचे पिनोचिओचे 'सियाओ पापा', 'टॉप गन: मॅवेरिक' आणि एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' गाणे. 'होल्ड माय हँड', लाडी गागा, ब्लडपॉप आणि बेंजामिन राईसचे 'लिफ्ट मी अप' हे गाणे 'ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएव्हर'चे या शर्यतीत होते. तर आता 'बेस्ट पिक्चर - नॉन इंग्लिश सेगमेंट' मध्ये, आरआरआर, कोरियन रोमँटिक मिस्ट्री फिल्म 'डिसिजन टू लीव्ह'शी स्पर्धा आहे.

आरआरआर हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्यासोबत आलिया भट्ट चित्रपटात झळकली होती. तर, अजय देवगणचाही स्पेशल अपीरन्स होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com