RRR संगीतकार एमएम कीरावानी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

RRR संगीतकार एमएम कीरावानी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

ऑस्कर 2023 मध्ये साऊथ सिनेमाच्या ब्लॉकबस्टर फिल्म 'आरआरआर' मधील 'नाटू नाटू' या सुपरहिट गाण्याने बाजी मारली.

ऑस्कर 2023 मध्ये साऊथ सिनेमाच्या ब्लॉकबस्टर फिल्म 'आरआरआर' मधील 'नाटू नाटू' या सुपरहिट गाण्याने बाजी मारली. त्यामुळे 'नाटू नाटू'चे संगीतकार एमएम कीरवानी ऑस्कर विजेते ठरले. आता कीरवानीबाबत मोठी बातमी येत आहे. आरआरआर संगीतकार एमएम कीरवानी यांना बुधवारी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमएम कीरवानी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा विशेष सन्मान मिळाला आहे.

RRR संगीतकार एमएम कीरावानी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
रवीना टंडन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान

या सोहळ्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. तसेच, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल चाहत्यांकडून कीरवानी यांचे अभिनंदन केले जात आहे. याआधी त्यांना अकादमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकले आहेत.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार एमएम कीरावानी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रवीना टंडन यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रवीनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी आधीच जाहीर झाली होती. आज या विजेत्यांना या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com