'War 2'मध्ये 'आरआरआर' फेम ज्युनियर एनटीआरची एन्ट्री
Admin

'War 2'मध्ये 'आरआरआर' फेम ज्युनियर एनटीआरची एन्ट्री

अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'वॉर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'वॉर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. 'वॉर 2' मध्ये आणखी एक मोठे नाव जोडले गेले आहे. आता या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरचेही नाव जोडले जात आहे.

'वॉर' हा सिनेमा 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता पुन्हा एकदा दुसऱ्या भागात हृतिक सोबत ज्युनियर एनटीआर झळकणार असल्याचं समोर आलं आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील सहावा सिनेमा 'वॉर 2' आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.

या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. यशराज फिल्मसच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com