Sai Tamhankar
Sai Tamhankar Team Lokshahi

सईला 'या' कारणामुळे चित्रपटामधून केलं रिजेक्ट

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमठवली आहे . सईने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केल आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमठवली आहे . सई सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या झी मराठी वाहिनीवर 'बस बाई बस' कार्यक्रम प्रचंड चर्चेत आहे. यावेळी या कार्यक्रमात सई सहभागी उपस्थित राहिली होती. ती सोशल मिडियावर काही खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांशीही नेहमीच कनेक्टेड असलेली पहायला मिळते.

Sai Tamhankar
Sai Tamhankar Bday: असा आहे सांगली ते बॉलिवूडपर्यंचा सईचा प्रवास

यावेळी सई झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'बस बाई बस' मध्ये उपस्थित होती. 'बस बाई बस' या कार्यक्रमात सईने तिला एका चित्रपटातून काढल्याचा किस्साही सांगितला. सईने म्हणाली की, माझं 'एका चित्रपटासाठी सिलेक्शन झालं होतं. पण शूटच्या एक दिवस आधी मला सांगण्यात आला की तू आता हा चित्रपट नाही करणार आहेस. तेव्हा मला ह्या गोष्टीच खूप वाईट वाटलं होतं. पुढे सई म्हणाली की, पण मला वाटतं जेव्हा असं काही होतं तेव्हाच माणूस अजून आत्मविश्नासाने उभा राहून त्यातून अजून काहीतरी छान करतो'. सईने हा किस्सा शेअर करून झाल्यावर त्यानंतर यावर सुबोध भावेंनी अजून एक प्रश्न सईला विचारतात की, काय कारण होत की त्यांनी तुला नाही म्हणाले. यावर सईने सांगितले त्यांनी मला 'तू चकणी आहेस'. असे उत्तर दिले.

सई ही आठवण सांगताना भावनिक झाल्याचे दिसते. सईचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर चाहत्यांनी कमेंटही भरभरुन केले आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com