सलमान खानने तिथे येऊन माफी मागावी अन्यथा...; लॉरेन्स बिश्नोईची थेट धमकी

सलमान खानने तिथे येऊन माफी मागावी अन्यथा...; लॉरेन्स बिश्नोईची थेट धमकी

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरे जावे, अशी धमकी दिली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षा वाढवली आहे.

लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, आपल्या बिष्णोई समाजात झाडे, वनस्पती आणि प्राणी यांच्याबाबत अनेक समजुती आहेत. सलमानने आमच्या समाजाचा अपमान केला आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये बिष्णोई समाजाचे मंदिर आहे आणि सलमानने तिथे येऊन माफी मागावी. त्यांनी असे केले तर आम्ही सलमानला काही करणार नाही आणि त्यांनी तसे केले नाही तर कायद्याचा अवलंब न करता आम्ही आमच्या पद्धतीने हिशेब चुकता करू. माझ्या मनात लहानपणापासूनच सलमानबद्दल राग आहे. त्याचा अहंकार आपण नक्कीच मोडून काढू. सलमानने आमच्या समाजातील लोकांनाही पैसे देऊ केले होते, पण आम्ही त्याला संपत्तीसाठी नव्हे तर आमच्या कारणासाठी मारणार आहोत, असे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्याला सलमान खानला धमकी दिल्याबद्दल अटक करण्यात आली. खरंतर, 2018 साली लॉरेन्स बिश्नोईने पहिल्यांदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून आतापर्यंत सलमान खान या टोळीच्या निशाण्यावर आहे. सलमान 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणात अडकला आहे. 2018 मध्ये सलमानच्या हत्येचा संपूर्ण कट रचण्यात आल्याचा खुलासा लॉरेन्सने केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com