'टायगर जख्मी है!' सेटवर सलमान खानला दुखापत, फोटो केला शेअर

'टायगर जख्मी है!' सेटवर सलमान खानला दुखापत, फोटो केला शेअर

'किसी का भाई किसी की जान' नंतर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आता त्याच्या नवीन चित्रपट टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

'किसी का भाई किसी की जान' नंतर बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आता त्याच्या नवीन चित्रपट टायगर 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता त्याने चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यांकडून चिंता व्यक्त होत आहे. 'टायगर 3'च्या सेटवर जखमी झाला असल्याचे सलमानने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन सांगितले आहे.

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर टायगर 3 चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याचा चेहरा दिसत नाही, परंतु त्याच्या डाव्या खांद्यावर वेदना कमी करणारा पॅच दिसत आहे. सलमानने कॅप्शनमध्ये सांगितले की, त्याचा खांदा कसा दुखावला गेला आहे. त्याने लिहिले की, 'जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही जगाचे वजन तुमच्या खांद्यावर उचलले आहे, तेव्हा तो म्हणतो जगाचे सोडा आणि पाच किलोचे डंबेल उचलून दाखवा, असे सलमानने म्हंटले आहे.

फोटोमध्ये सलमान खानची ही अवस्था पाहून चाहते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, लवकर बरे व्हा. दुसर्‍याने टिप्पणी केली की स्वतःची काळजी घ्या. तर आणखी एका चाहत्याने लिहिले, वाघाची शिकार करण्यासाठी लवकर बरा व्हा. जखमी वाघ आणखी धोकादायक आहे, असेही एका चाहत्याने लिहीले आहे.

विशेष म्हणजे, सलमान खानचा 'टायगर 3' हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. यामध्ये कतरिना कैफसोबत सलमान दिसणार आहे. 'टायगर 3'मध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानही कॅमिओ करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com