'शकुंतलम'च्या प्रमोशनदरम्यान समंथाची प्रकृती बिघडली, आवाजही गमावला

'शकुंतलम'च्या प्रमोशनदरम्यान समंथाची प्रकृती बिघडली, आवाजही गमावला

साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी 'शकुंतलम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी 'शकुंतलम' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चित्रपटाव्यतिरिक्त समंथा तिच्या तब्येतीमुळेही चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान समंथाची प्रकृती खालावली आहे. यावेळी तिचा आवाजही गेल्याचे समोर येत आहे. याची माहिती स्वतः समंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे

समंथाने ट्विटरवरुन आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. या आठवड्यात मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप उत्सुक होते. पण, व्यस्त कार्यक्रमांमुळे माझ्या तब्येतीवर परिणाम झाला आहे आणि मला ताप आला आहे. यामुळे मी माझा आवाजही गमावला आहे, असे तिने सांगितले आहे. दरम्यान, याआधीही समंथा मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त होती.

यामुळे समंथाचे चाहते चिंतीत झाले असून तिची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, 'लवकर बरे व्हा मॅडम. आमच्या प्रार्थना आणि प्रेम तुमच्या पाठीशी आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, 'आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला सदैव तयार आहोत. तुझ्यावर प्रेम आहे. एकाने लिहिले, 'तुझा चित्रपट हिट होईल, फक्त तुझ्या फिटनेसची काळजी घे.'

दरम्यान, समंथाचा 'शकुंतलम' हा कालिदासाच्या प्रसिद्ध नाटक शकुंतलावर आधारित आहे. ती एक पौराणिक कथा आहे. 'शाकुंतलम' 14 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दुसरीकडे, ती विजय देवरकोंडासोबत 'खुशी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर समंथा लवकरच अमेरिकन टीव्ही मालिकेच्या सिटाडेलमध्ये दिसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com