'हर हर महादेव'विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; झी वाहिनीचे एक पाऊल मागे, वादग्रस्त प्रसंग...

'हर हर महादेव'विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; झी वाहिनीचे एक पाऊल मागे, वादग्रस्त प्रसंग...

'हर हर महादेव' हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला.

अमोल धर्माधिकारी | पुणे : 'हर हर महादेव' हा वादग्रस्त चित्रपट झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून १८ डिसेंबर रोजी टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटास राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असा पवित्रा संभाजी ब्रिगेडने घेतला होता. याविरोधात संभाजी ब्रिगेडने झी स्टुडीओला नोटीसही पाठविण्यात आली होती. अखेर झी स्टुडीओने एक पाऊल मागे घेतले आहे.

हर हर महादेव चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंगाबाबत संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडला होता. या विरोधात संभाजी ब्रिगेडने पुण्यातील चित्रपटगृह बंद पाडली होती. तसेच आक्रमक भूमिका सुद्धा घेतली होती.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हर हर महादेव चित्रपटाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून 'सेन्सर बोर्ड'कडे सुद्धा तक्रार केली होती. तसेच आक्षेपार्ह प्रसंग बाबत वकिलांमार्फत नोटीस सुद्धा पाठवण्यात आली असल्याचे संभाजी ब्रिगेडने सांगितले होते. अखेर संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यास यश आले असून चित्रपटातील सर्व वादग्रस्त प्रसंग वगळण्याचं झी स्टुडिओ आणि हर हर महादेव चित्रपटातील टीमने मान्य केला आहे.

झी स्टुडिओच्या मुंबईतील कार्यालयात आज 14 डिसेंबर 2022 रोजी संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि सहकाऱ्यांनी याबाबत परखड भूमिका घेतली होती. म्हणूनच झी स्टुडिओ आणि संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेत समर्थन देऊन वादग्रस्त प्रसंग वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com