Sameer Khakkar : 'नुक्कड'मध्ये खोपडीची भूमिका गाजवणारे अभिनेते समीर खक्कर यांचं निधन
Admin

Sameer Khakkar : 'नुक्कड'मध्ये खोपडीची भूमिका गाजवणारे अभिनेते समीर खक्कर यांचं निधन

'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत खोपडीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाले आहे.

'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत खोपडीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते समीर खक्कर यांचे निधन झाले आहे. अलीकडेच सतीश कौशिक यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अशात अभिनेते समीर खक्कर यांच्या निधनाच्या वृत्ताने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

अभिनेते समीर खक्कर छोट्या छोट्या भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अलविदा केले आणि अमेरिकेत शिफ्ट झाले, अमेरिकेतून परतल्यानंतरही ते इंडस्ट्रीत सक्रिय झाले. मनोरंजन, श्रीमान श्रीमती, अदालत यात काम केले होते. हसी तो फसी, पटेल की पंजाबी शादी, पुष्पक, दिलवाले, राजा बाबू, यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.

समीर खक्कर यांना श्वासोच्छवासाचा त्रास आणि इतर वैद्यकीय समस्या होत्या. 14 मार्च रोजी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना बोरिवली येथील एमएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. वयाच्या 71 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com