Satish kaushik passed away
Satish kaushik passed away

प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड, 66 व्या घेतला अखेरचा श्र्वास

सतीश कौशिक यांची मिस्टर इंडियातील भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

मुंबई : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता सतीश कौशिक यांचे निधन (Satish kaushik passed away) झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते अनुपम खेर यांची ट्विट करून ही माहिती दिली. कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी 9 मार्चच्या पहाटे ट्विट केले की, अभिनेते सतीश कौशिक आता या जगात नाहीत. सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहताना अनुपम खेर यांनी लिहिले की, आपल्या जिवलग मित्राबद्दल मी असे लिहीन असे कधीच वाटले नव्हते.

अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले, असे ट्विट अभिनेते अनुपम खेर यांनी गुरुवारी (9 मार्च) पहाटे केले. ते म्हणाले, “मला माहित आहे की मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे! पण कधीतरी माझ्या जिवलग मित्राबद्दल ही गोष्ट लिहीन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! सतीश तुझ्याशिवाय आयुष्य कधीच पहिल्यासारखे राहणार नाही!” अनुपम खेर यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

सतीश कौशिक हे भारतीय अभिनेता, विनोदी कलाकार, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1965 रोजी हरियाणा येथे झाला. बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळवण्यापूर्वी त्याने थिएटरमध्ये अभिनय केला.

एक चित्रपट अभिनेता म्हणून, सतीश कौशिक 1987 च्या सुपरहिरो चित्रपट, मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर, दीवाना मस्ताना (1997) मधील पप्पू पेजर आणि सारा दिग्दर्शित ब्रिक लेन (2007) मधील चानू अहमद यांच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. गॅव्ह्रॉन. सतीश कौशिक यांना 1990 मध्ये राम लखन आणि 1997 मध्ये साजन चले ससुरालसाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com