शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटासाठी बुक केलं अख्खं थिएटर; शाहरुख खानने मानले आभार
Admin

शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटासाठी बुक केलं अख्खं थिएटर; शाहरुख खानने मानले आभार

देशातील सुपरस्टार शाहरुख खान याचा आगामी चित्रपट पठाण हा जितका वादात सापडला तितकाच त्याला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय देसाई, सांगली

देशातील सुपरस्टार शाहरुख खान याचा आगामी चित्रपट पठाण हा जितका वादात सापडला तितकाच त्याला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाहरुख खान चे चाहते या पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी ऍडव्हान्स बुकींग करत आहेत.

सांगली शहरातील शाहरुख खानच्या चाहत्यांनी तर फर्स्ट दे फर्स्ट शोचा संपूर्ण ऑडिटोरिअमच बुक केला असल्याची माहिती वसीम तांबोळी आणि महंमद कोकणे यांनी दिली. विजयनगर मधील औरम सिनेमा थिएटर मध्ये हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सकाळी साडे नऊच्या शो साठी एसआरके युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. ट्विटर हॅण्डलवर सदरची माहिती प्रसिद्ध होताच शाहरुख खानने देखील चाहत्यांचे आभार मानत तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्यामुळे 'पठाण'च्या 'फर्स्ट डे फर्स्ट शो'ची चाहत्यांना उत्सुकता आहे. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com