Farzi
FarziTeam Lokshahi

'या' सिरीजमधून शाहिद कपूर आणि विजय सेतुपती करणार ओटीटी विश्वात पदार्पण

10 फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार शाहिद कपूर आणि विजय सेतुपती अभिनीत क्राईम थ्रिलर सिरीज

नवीन वर्षाची सुरुवात करत प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी बहुप्रतीक्षित सिरीज 'फर्जी'ची घोषणा केली आहे. अशातच, ‘फॅमिली मॅन’ सारखी सुपरहिट सिरीज देणारे राज आणि डीके D2R फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित 'फर्जी' या सिरीजमधून बॉलीवूड हार्टथ्रोब शाहिद कपूर आणि कॉलिवुडचा सर्वात लाडका स्टार विजय सेतुपती हे दोन्ही कलाकार डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज आहेत. ही सिरीज 10 फेब्रुवारी रोजी जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अशातच, या सिरीजमध्ये राशि खन्ना, अत्यंत कुशल के.के. मेनन, दिग्गज अभिनेते अमोल पालेकर, रेजिना कॅसॅंड्रा आणि भुवन अरोरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आठ भागांची असलेली 'फर्जी' ही अनोखी क्राईम थ्रिलर सिरीज, तीव्र आणि चपखल आहे.

तसेच, शोमध्ये दिग्दर्शक जोडीचा ट्रेडमार्क ह्युमर पाहायला मिळणार असून, यामध्ये श्रीमंतांची बाजू घेणार्‍या व्यवस्थेला रोखण्यासाठी एका हुशार अंडरडॉग स्ट्रीट आर्टिस्टने केलेला प्रयत्न पाहायला मिळेल. त्याची आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी ही एक रोमांचक शर्यत आहे जिथे हरणे हा पर्याय नाही. अशातच, राज आणि डीके सोबत 'फर्जी' सीरिज सीता आर मेनन आणि सुमन कुमारद्वारा लिखित आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com