शाहरुखची आता जॉनवर नजर; केलं चुंबन आणि म्हणाला...
Admin

शाहरुखची आता जॉनवर नजर; केलं चुंबन आणि म्हणाला...

शाहरुख खानला बॉलीवूडमध्ये ३ दशकांहून अधिक काळ झाला आहे.

शाहरुख खानला बॉलीवूडमध्ये ३ दशकांहून अधिक काळ झाला आहे. रोमान्सच्या बादशहाने तब्बल ४ वर्षांनी अॅक्शन चित्रपटातून पुनरागमन केले आहे. शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अलीकडेच शाहरुख खान आणि चित्रपटाची टीम दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि सिद्धार्थ आनंद यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रपटाविषयी चर्चा केली.

यादरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जॉन अब्राहम काहीतरी बोलतो, त्याच वेळी शाहरुख त्याच्या जागेवरून उठतो आणि जॉन अब्राहमला किस करतो. जे पाहून चाहते पुन्हा एकदा-वन्स मोर ओरडतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे पाहून जॉन लाजला. आणि म्हणाला माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडतंय आणि मी पहिल्यांदा इतका लाजत आहे.

शाहरुख खान दीपिकाबद्दल म्हणतो की, मी तिला अनेकदा किस केले आहे. तर दीपिकाने किंग खानचे चुंबनही घेतले. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेता जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण झळकले आहेत. दीपिका आणि शाहरुखची केमिस्ट्री प्रत्येकालाच माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com