Pathaan
PathaanTeam Lokshahi

शाहरुखच बॉक्स ऑफिसचा बादशहा, पहिल्याच दिवशी 'पठाण'ची 100 कोटी कमाई

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पठाणच्या पहिल्या दिवसाचे जगभरातील कलेक्शनही येऊ लागले असून या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केल्याचे संकेत मिळत आहेत. यानुसार शाहरुख खानने तोच बॉक्स ऑफिसवरील बादशहा असल्याचे दाखवून दिले आहे.

चित्रपट तज्ज्ञ रमेश बाला यांनी शाहरुख खानच्या पठाणच्या कलेक्शनबद्दल ट्विट केले आहे. पठाणने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. यूएई आणि सिंगापूरमध्ये हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यानुसार पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जगभरात १०० कोटींचा टप्पा पार करणारा शाहरुख खान पहिला बॉलिवूड अभिनेता ठरला आहे.

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत आहेत. शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर परतला आहे. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. यानंतर शाहरुख खान जवान आणि डंकी या चित्रपटातही दिसणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com