Pathan Movie
Pathan MovieTeam Lokshahi

शाहरूखचा 'पठाण' ठरला ब्लॉकबस्टर; प्रभासच्या 'बाहुबली 2' ला पण टाकले मागे

चित्रपटाची एकूण जागतिक कमाई 1029 कोटींवर गेली आहे.
Published by :
Sagar Pradhan

सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा पठाण चित्रपट प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सोबतच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर या चित्रपटाला बायकॉट करण्याची देखील मागणी करण्यात आली होती. त्याच वादात सापडलेल्या पठाण चित्रपटाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या 38व्या दिवसाच्या कमाईने पुन्हा एकदा नवा विक्रम रचला असून यावेळी चित्रपटाने एसएस राजामौली यांच्या बाहुबली 2 ला मागे टाकले आहे. त्यामुळे पठाण हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

पठाण या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. शाहरुखचा हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. दुसरीकडे, कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, बाहुबली 2 च्या हिंदीने बॉक्स ऑफिसवर 510.99 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर पठाणने सहाव्या आठवड्यात 511.75 कमाई केली आहे. तर सर्व भारतीय भाषांनी मिळून 529.44 कोटी कमावले आहेत. त्याचवेळी, चित्रपटाची एकूण जागतिक कमाई 1029 कोटींवर गेली आहे. त्यामुळे पठाण हा भारतातील नंबर वन हिंदी चित्रपट बनला आहे. ही बॉलिवूडसाठी अभिमानाची बाब आहे. किंग खानच्या पठाणने रिलीज झाल्यापासून अनेक विक्रम मोडले आहेत. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com