बिग बॉस 16 : मग तुम्ही दोघी लेस्बियन होता का?”; अभिनेता शालीन भानोतने वादग्रस्त विधान

बिग बॉस 16 : मग तुम्ही दोघी लेस्बियन होता का?”; अभिनेता शालीन भानोतने वादग्रस्त विधान

‘बिग बॉस १६’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच बिग बॉस १६’च्या घरामध्येही नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं.

‘बिग बॉस १६’ हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच बिग बॉस १६’च्या घरामध्येही नव्या वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. टीना दत्ता व शालीन भानोत ही जोडी घरामध्ये कायमच चर्चेत राहिली आहे.

मध्यंतरी टीना घराबाहेर पडल्यानंतर तिला पुन्हा हा खेळ खेळण्याची संधी देण्यात आली. जेव्हा ती या घरामध्ये परतली तेव्हा शालीन व टीनामध्ये वाद निर्माण झाला. मात्र पुन्हा एकदा शालीन व टीना एकत्र आले. नव्या वर्षाचं सेलिब्रेशनमध्ये त्यांचा रोमान्स पाहायला मिळाल. त्यांचा हा रोमान्स सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

यावेळी अर्चना गौतम आणि शालीनमध्ये जोरदार भांडण होते. यात शालीन अर्चनाला म्हणाला की, “टीना व माझ्यामध्ये फक्त मैत्री आहे. आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ आहोत याचा अर्थ असा नाही की रिलेशनशिपमध्ये आहोत. तसं पाहायला गेलं तर तू आणि सौंदर्याही एकाच बेडवर चादर घेऊन झोपता. मग तुम्ही दोघी लेस्बियन होता का?”असे विधान त्याने केले.

यावर भडकलेली अर्चना निम्रितला हे सर्व सांगत असताना म्हणते की, “शालीनची मुलं जेव्हा शाळेत जात असतील तेव्हा त्याच्या मुलांनाही लोक ऐकवत असतील. तुमचे वडील ‘बिग बॉस’मध्ये काय करतात? असं लोक बोलत असतील.” असे अर्चना त्यांना म्हणते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com