Shilpa Shetty Kids
Shilpa Shetty KidsTeam Lokshahi

Shilpa Shetty Kids Janmashtami 2022: शिल्पा शेट्टीच्या मुलांनी साजरी केली जन्माष्टमी, पाहा क्यूट व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिची मुलं दहीहंडीचा सण साजरा करताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिची मुलं दहीहंडीचा सण साजरा करताना दिसत आहेत. शिल्पा शेट्टीचा मुलगा मटकी फोडताना दिसत आहे. त्यानंतर तो इतर मुलांसोबत खेळताना दिसत आहे. त्याने कपाळावर मोराच्या पिसांपासून बनवलेला मुकुटही घातला आहे.त्याने एका हातात बासरीही धरली आहे.

शिल्पा शेट्टीने 'हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की' या घोषणेने व्हिडिओचा शेवट केला. व्हिडिओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने लिहिले, 'हाथी घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गोकुळ अष्टमीच्या शुभेच्छा.

शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ साडे तेरा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर त्यावर 142 कमेंट्स करण्यात आल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'खूप क्यूट' लहान बाबा कुटुंबासोबत एन्जॉय करा' एकाने लिहिले, 'जय श्री कृष्ण' एकाने लिहिले, 'जन्माष्टमीच्या शुभेच्छा' एकाने लिहिले, सुंदर' एकाने लिहिले, 'जन्माष्टमीच्या शुभेच्छा'

याआधी शिल्पा शेट्टीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता.त्यामध्ये ती जय कन्हैया लाल असे लिहून जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com