शिव ठाकरे झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

शिव ठाकरे झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?

बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आला आहे.

बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आला आहे. मराठमोळ्या शिव ठाकरेने या शोमधून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असलेला शिव ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘बिग बॉस १६’ चा फिनाले जवळ आला असून शिव ठाकरेच या पर्वाची ट्रॉफी जिंकणार असं अनेकांना वाटत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आगामी काळात सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’, ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या दोन पैकीच एका चित्रपटात शिवही झळकेल असं बोललं जात आहे. त्या चित्रपटात शिवची महत्वपूर्ण भूमिका असेल. तसेच अब्दु रोजिकही या चित्रपटात दिसणार हे काही दिवसांपूर्वीच समोर आहे. अशी माहिती मिळत आहे.

हे कळल्यावर त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. याच्याआधी शिवने ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’मधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com