मनोज बाजपेयीचा कोर्टरूम ड्रामा चित्रपटाची शूटिंग पूर्ण; टीमने केले सेलिब्रेशन

मनोज बाजपेयीचा कोर्टरूम ड्रामा चित्रपटाची शूटिंग पूर्ण; टीमने केले सेलिब्रेशन

मनोज बाजपेयी अभिनीत एक पॉवर-पॅक कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी सज्ज

विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओज लिमिटेड तसेच सुपर्ण एस वर्मा आणि झी स्टुडिओज आता प्रेक्षकांसाठी मनोज बाजपेयी अभिनीत एक पॉवर-पॅक कोर्टरूम ड्रामा घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे जोधपूर शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शूटिंग मुंबईत पूर्ण केले. अलीकडेच, मनोज बाजपेयी यांनी या अनटायटल्ड चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

चित्रपटाच्या शेवटच्या सीनचे शूटिंग करताना सर्व कलाकार आणि क्रू यांनी पॉवरहाऊस अभिनेता मनोज बाजपेयी यांचे उभे राहून अभिवादन केले, हा एक कोर्टरूम सीन होता. यानंतर केक कापून चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. तसेच, या बहुप्रतिक्षित चित्रपटात केलेल्या कामाबद्दल संपूर्ण टीमने कृतज्ञतादेखील व्यक्त केली. अशातच, दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की या हार्ड हिटिंग चित्रपटाद्वारा हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण करत असून या चित्रपटात उत्कृष्ट कलाकारांना पाहायला मिळेल.

झी स्टुडिओज आणि भानुशाली स्टुडिओज द्वारा प्रस्तुत, अपूर्व सिंग कार्कीद्वारा दिग्दर्शित, सुपर्ण एस वर्माच्या या कोर्टरूम ड्रामाची निर्मिती विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानी यांनी केली आहे. तसेच, हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com