Shraddha Kapoor
Shraddha KapoorTeam Lokshahi

श्रद्धा कपूरने चाहत्यांना विचारला 'असा' प्रश्न की चाहते चक्रावले

श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा रंगात आहेत.
Published on

श्रद्धा कपूरच्या 'तू झूठी मैं मक्कार' या आगामी चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा रंगात आहेत. अशात श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर क्वेश्चन ऑफ द ईयर पोस्ट करत, '२०२३ मध्ये प्रेमात काय अवघड आहे'? असे विचारले. यावरुन 'तू झूठी मैं मक्कार' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरने या ट्विस्ट दिल्याचे दिसते. दरम्यान 'तू झूठी मैं मक्कार'हा चित्रपट प्रेम आणि नातेसंबंधांवर फ्रेश आणि कंटेम्पररी टेकसह मॉडर्न बनण्यासाठी सज्ज आहे.

तसेच, या सिनेमाद्वारा रणबीर आणि श्रद्धाची जोडी प्रथमच दर्शकांच्या भेटीला येणार असून, काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टायटल अनाऊंसमेंट व्हिडिओमध्ये दोघांच्या सिझलिंग केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळाली. आता, श्रद्धाच्या या प्रश्नाचे उत्तर देणे थोडे कठीण असले तरी तिच्या या प्रश्नाने प्रेक्षकांची ट्रेलरची अपेक्षा काही प्रमाणात नक्कीच वाढवली आहे.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com