Sidharth Kiara Marriage
Sidharth Kiara MarriageTeam Lokshahi

लग्नानंतर पाहिल्यांदाच दिसले सिध्दार्थ आणि कियारा; पाहा नवं वर-वधु

कियाराच्या भांगेतील सिंदूर, हातातील चुडा आणि गळ्यातील मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नांची प्रचंड चर्चा सुरु आहे. काल म्हणजेच 7 फेब्रुवारीला जैसलमेरमधल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं पालन करावं लागल्याने सोशल मीडियावर कोणतेच फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत. काल रात्री कियारा आणि सिद्धार्थने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. या जोडीला पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये प्रचंड निर्माण झाली आहे. त्यातच आज ते दोघेही कॅमेरात कैद झाले आहे.

लग्नानंतर ही जोडी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आली आहे. लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थला आज (8 फेब्रुवारी) जैसलमेर एअरपोर्टवर दिसले. हे दोघं जैसलमेरहून दिल्लीसाठी रवाना होत होते. यावेळी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स आणि त्यावर काळ्या रंगाचा जॅकेट असा सिद्धार्थचा कॅज्युअल लूक होता. तर कियाराने काळ्या रंगाची पँट त्यावर काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाचा शॉल घेतला होता. कियाराच्या भांगेतील सिंदूर, हातातील चुडा आणि गळ्यातील मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com