6 फेब्रुवारीला नाही तर 'या' दिवशी होणार सिद्धार्थ-कियाराचा विवाह

6 फेब्रुवारीला नाही तर 'या' दिवशी होणार सिद्धार्थ-कियाराचा विवाह

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे.

बॉलिवूड अभिनेता मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. सध्या या दोंघांच्याही लग्नाची तयारी सुरू झाली आहे. त्यांच्या लग्नामुळे त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. त्यांच्या लग्नसमारंभाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले आहेत. 6 फेब्रुवारी रोजी लग्न करतील असं आतापर्यंत बोललं जात होतं. मात्र आता त्यांच्या लग्नाची तारीख वेगळीच असल्याचं समोर आलं आहे. सिद्धार्थ आणि कियाराचा मेहंदी समारंभ आज संध्याकाळी रंगणार आहे. तर उद्या सकाळी त्यांचा हळदी समारंभ पार पडेल. उद्या संध्याकाळी त्यांचं संगीत होईल आणि परवा म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी या दोंघाच्या विवाह सोहळा होणार आहे.

सिद्धार्थ आणि कियारा चा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. या लग्नासाठी 100 ते 125 लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com