Kiara Advani Weds Sidharth Malhotra
Kiara Advani Weds Sidharth Malhotra Team lokshahi

सिडची झाली कियारा! जैसलमेरमध्ये झाला शाही विवाहसोहळा

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही लग्नसोहळा पार पडला आहे.

बॉलीवूडचे लव्हबर्डस् कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज विवाहबंधनात अडकले आहेत. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही लग्नसोहळा पार पडला आहे. यामध्ये कुटुंबीय, मोजक्या मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होती. या दोघांचे फोटो अद्याप समोर आलेले नाही.

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर आज दुपारी दोघेही विवाहबंधनात अडकली आहेत. या लग्नातदेखील 'नो फोन पॉलिसी'चा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आलेले नाहीत. कुटुंबीय, पाहुणे, मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनादेखील लग्नसोहळ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्याची विनंती करण्यात आली आहे.

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी, कबीर सिंह, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जौहर, मनीष मल्होत्रा आणि जूही चावला असे अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com