बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सोनाक्षी सिन्हाच्या 'दहाड'चा प्रीमिअर

बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सोनाक्षी सिन्हाच्या 'दहाड'चा प्रीमिअर

'दहाड'ही सिरीज बर्लिनले येथे प्रीमियर होणारी पहिली भारतीय सिरीज

एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि टायगर बेबीद्वारा निर्मित तसेच रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉयद्वारा दिग्दर्शित 'दहाड'ही सिरीज बर्लिनले येथे प्रीमियर होणारी पहिली भारतीय सिरीज आहे. तसेच, या सिरीजला बर्लिनले सिरीज कॉम्पिटिशनमध्ये इतरांसोबत स्पर्धा करताना पाहायला मिळेल.

'दहाड' ही सिरीज राजस्थानमधील एका छोट्याशा शहरात स्थित आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमधील सब-इंस्पेक्टर अंजली भाटी आणि त्यांच्या सहकार्‍यांना फॉलो करणारी ही 8 भागांची स्लो बर्न क्राईम ड्रामा सिरीज आहे. जेव्हा अनेक महिला पब्लिक बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळतात तेव्हा सब-इंस्पेक्टर अंजली भाटी यांना तपासासाठी नियुक्त केले जाते. सुरुवातीला मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे वाटते, परंतु प्रकरण जसजसे उघडकीस येते तसे अंजलीला असा संशय येऊ लागतो की या हत्यांमागचा सिरियल किलर मोकळे फिरत आहे. त्यानंतर अंजली दुसर्‍या निष्पाप महिलेचा जीव वाचवण्यासाठी पुरावे एकत्र करते आणि एक अनुभवी गुन्हेगार आणि दलित पोलिस यांच्यातील मांजर आणि उंदराचा मनोरंजक खेळ सुरू होतो.

'दहाड'च्या आधी, रीमा कागतीने 'तलाश', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'गली बॉय' (बर्लिनले येथे सादर झालेले) यासारख्या चित्रपटांसह क्रिटिकली अकलेम्ड आणि आवडत्या कथा दिल्या आहेत. तसेच, 'मेड इन हेवन' सारखी उत्कृष्ट वेब सिरीजही त्यांनी दिली आहे. अशातच, रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉयद्वारा दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, झोया अख्तर, रीमा कागती आणि फरहान अख्तरद्वारा निर्मित 'दहाड'ही वेब सिरीज २०२३ मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com