सोनाली निघाली टॉलीवूडला; 'या' साऊथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रिन शेअर

सोनाली निघाली टॉलीवूडला; 'या' साऊथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रिन शेअर

सोनाली कुलकर्णी लवकरच टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे.

अनेक कलाकार वेगवेगळ्या भाषेतील चित्रपटात काम करत आहेत. बॉलीवूड-टॉलीवूड हा प्रवासही अनेक कलाकारांनी केला आहे. यात आता मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राची लाडकी अप्सरा सोनाली कुलकर्णी. ती लवकरच टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार आहे.

सोनाली कुलकर्णी लवकरच मल्याळम सिनेमात काम करणार आहे. सोनाली कुलकर्णीने नवीन वर्षातील पहिली पोस्ट करत ही गूड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने सिनेमाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. Malaikottai Vaaliban असे तिच्या चित्रपटाचे नाव आहे. नवीन वर्षातील या नव्या प्रवासाचा अनुभव घेण्यास सज्ज असल्याचे तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हंटले आहे. विशेष म्हणजे सोनाली साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत झळकणार आहे.

सोनाली कुलकर्णीच्या नव्या प्रवासासाठी मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच तिच्या चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनालीचा 'व्हिक्टोरिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com