Sonam kapoor baby
Sonam kapoor babyTeam Lokshahi

सोनामच्या बाळाला एक महिना पूर्ण, बाळाचे नाव केले जाहीर

सोनम आणि आनंदच्या मुलाचं नाव ‘वायू’

बॉलीवूड मधील प्रसिद्ध आणि बहुचर्चित अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या घरी 20 ऑगस्ट रोजी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले होते. सोनमच्या बाळाला आज (मंगळवार) महिना पूर्ण झाला आहे. एक महिना पूर्ण झाल्यामुळे त्या दोघांनी आनंद साजरा केला. यानिमित्त पहिल्यांदाच बाळासोबतचा फोटोसुद्धा दोघांनी शेअर केला आहे. बाळाचा फोटो पोस्ट करत त्या बाळाचे नाव जाहीर केलं आहे. सोनम आणि आनंदने त्यांच्या मुलाचं नाव ‘वायू’ असं ठेवलं आहे. या नावाबाबत त्यांनी एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

काय आहे नावाचा अर्थ ?

हिंदू धर्मग्रंथांमध्ये वायु हे पंच तत्वांपैकी एक आहे. तो श्वासोच्छ्वासाचा देव आहे, हनुमान, भीम आणि माधव यांचा आध्यात्मिक पिता आहे आणि तो वाऱ्याचा अविश्वसनीय शक्तिशाली स्वामी आहे.प्राण हे वायु आहे, विश्वातील जीवन आणि बुद्धिमत्तेची मार्गदर्शक शक्ती. प्राण, इंद्र, शिव आणि काली या सर्व देवता वायूशी संबंधित आहेत.तो जितक्या सहजतेने वाईटाचा नाश करू शकतो तितक्याच सहजतेने प्राण्यांमध्ये जीवन श्वास घेऊ शकतो. वायुला वीर, शूर आणि मोहक सुंदर असे म्हटले जाते. वायू आणि त्याच्या कुटुंबासाठी तुमच्या निरंतर शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. अशी पोस्ट यावेळी तिने सोशल मीडियावर केली.

Lokshahi
www.lokshahi.com